बुधवार, 16 जून 2010

तिळा तिळा दार उघड ....


शरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य

तिळा तिळा दार उघड .... आठवलं काही ? हो त्या परवलीच्या शब्दा नंतर गोष्टीतील  अलीबाबाचं भाग्य उजळतं,
 पण आपल्या शरीरावर असणार्‍या तिळाने तुमच्या भाग्याचे दरवाजे कशे उघडणार हे मात्र कळू शकतं. आपल्या शरीरावर कीती तिळ आहेत हे कधी तपासा आणि त्याचा तुमच्या भाग्याशी असणारा संबंध बघा....


शरीर वर तिळ -----    त्याचे फळ
कपाळावर ---------        बलवान असाल.
हनुवटीवर--------          स्त्रीशी प्रेम कमी.
भुवयांच्यामध्ये--           प्रवास होत रहातील.
उजव्या डोळ्यावर ----   स्त्रीशी प्रेम.
डव्या डोळ्यावर----      स्त्रीशी कलह.
उजव्या गालावर-----     धनवान होइल.
डव्या गालावर------       खर्च वाढत जाइल.
ओठांवर----------           विषय-वासना यात गुंतुन राहील.
कानावर----------          अल्पायु होण्याची शक्यता.
मानेवर----------            आराम मिळेल.
उजव्या हातावर-----      मान-प्रतिष्ठा मिळेल.
डव्या हातावर------       भांडखोर स्वभाव राहील.
नाकावर----------          यात्रा प्रवास होतील.
उजव्या छाती वर-----    स्त्रीशी प्रेम राहील.
डव्या छाती वर------     स्त्रीशी भांडणे होतील.
कमरेवर-----------          आयुष्य त्रासात जाईल.
दोन्हीं छातीच्या मध्ये---जीवन सुखी रहील.
पोटावर----------           उत्तम भोजनसाठी इच्छुक.
पाठीवर---------            प्रवासात रहातील.
उजव्या तळव्यावर------ बलवान होइल.
डव्या तळव्यावर------    खूप खर्च करेल.
उजव्या हातच्या पाठी-- धनवान होइल.
डव्या हाताच्या पाठी---कमी खर्च करा.
उजव्या पायावर---------बुद्धिमान होइल.
डव्या पायावर ---         खर्च अधिक होइल.

करिअर मध्ये सफलता गुण व ग्रहयोग यांचा संबंध


नोकरी-धंद्या मध्ये सफलता व प्रगती होण्या साठी व्यक्ति मध्ये अनेक गुण असावे लागतात. सर्वच गुण एकाच  व्यक्ति मध्ये सापडणे संभव नसते. कोणा कडे  योग्यता आहे तर कोणास बराच अनुभव  असतो. कोणी व्यक्ति अपल्या कर्यक्षेत्रामध्ये स्नेह पूर्ण व सहयोगपूर्ण व्यवहार असल्याने सफल होतो. तर कोणी बोलण्याच्या चातुर्या मुळे जम बसवून असतो काही  कार्यनिष्ठा असल्याने सफलता  प्राप्त करुन घेतात. अपल्या कार्यशक्ति व दक्षता यांचा सर्वोतम उपयोग करुनच आजच्या गळेकापू स्पर्धेच्या युगामध्ये पुढे जाण्याचे साहस करुशकतात. ज्योतिष शास्त्रा अनुसार कोणत्या ग्रहांमुळे  व्यक्ति मध्ये कोणत्या गुणांचा विकास होतो ते आपण पाहुया......

1. कामाचे स्वरुप व त्याची जबाबदरी ओळ्खण्याची कुवत (Understanding The Job Responsibilities)
 काम लहान असो की मोठे ते करण्याची पद्धत एकसमानच असेलच असे नाही, प्रत्येक व्यक्ति कार्य आपल्या योग्यते  नूसार करतो.जेंव्हा कोणा व्यक्तिला आपले कामकाज नीट समझत नाही तेंव्हा त्याला त्या कार्यक्षेत्रा मध्ये अडचणींचा सामना करावा लागु शकतो. व्यक्तिचे  कार्य  उत्कृ्ष्ट बनवण्या साठी ग्रहांमध्ये गुरु ग्रहाचे कारकत्व बघतात.

कुण्डली मध्ये  गुरु बलवान व मार्गी असला व तो शुभ ग्रहांच्या प्रभाव मध्ये असला तर तो व्यक्तिस  अपल्या क्षेत्रात उतम ज्ञान असण्याची शक्यता जास्त असते.(Strong Jupiter suggests excellent knowledge). गुरु जन्म कुण्डली मध्ये नीच राशित (Guru in Neecha Rashi), वक्री वा अशुभ ग्रह  प्रभावा मध्ये असेल तर व्यक्ति मध्ये कामकाजा  संबधीत जाणकारी  कमी असु शकते. सर्व ग्रहांमध्ये  गुरु  ज्ञान  कारक ग्रह समजला जातो. गुरु ग्रह व्यक्तिस चांगली स्मरणशक्ति प्रदान करतो.त्या मुळे चांगल्या  स्मरणशक्तिच्या मुळे व्यक्ति अपल्या योग्यतेचा नेमक्या वेळी उपयोग करु शकतो.

2. कार्यक्षमता व दक्षता (Skills & Performance Through Astrology)
 कोणाही व्यक्ति मध्ये कार्यक्षमतेचा स्तर तपासण्या साठी कुण्डली मध्ये शनिची स्थिति बघीतली जाते.(Saturn's position is considered for judging skills).कुण्डली मध्ये शनि दशम भावशी संबंध असल्यास  व्यक्तिस कार्यक्षेत्र मध्ये अत्यंत अधिक कार्यभार असतोच असतो.काही वेळा असेही होते की व्यक्ति मध्ये उतम योग्यता असते परंतु त्याचे कार्या मध्ये मन  लागत नाही.
 अशा स्थिती मध्ये व्यक्ति अपली  योग्यतेचा पूर्ण उपयोग करु शकत नाही किंवा व्यक्तिचे बारावा भाव बलवान  (Strong 1२th house)  असल्यास व्यक्तिस आराम करण्याची आवड फार असते. त्यामुळे तो व्यक्ती आळ्शी बनतो. व अश्या स्थिति मध्ये व्यक्ति अपल्या उत्तरदायीत्वांशी ( कामा पासुन ) पळ काढतो. या जबाबदार्‍या पारिवारीक, सामाजिक, उपजिविकेच्या माध्यमा संबंधीत असु शकतात. शनि बलवान स्थिती मध्ये असल्यास व्यक्तिच्या कार्या मध्ये दक्षता येते.

3. कार्यनिष्ठा: (Analysis of Dedication through Jyotish)
 जन्म कुण्डली  अनुसार व्यक्ति मध्ये  कार्यनिष्ठा  भाव बघण्यासाठी दशम घराशी शनिचा संबध बघीतला जातो.(Saturn's relationship to the 10th house). आपल्या कार्याला अनुशासन बघण्यासाठी सूर्याची स्थिती बघीतली जाते. शनि व सूर्याच्या स्थिती अनुसार व्यक्ति मध्ये अनुशासन  भाव निर्माण होतो. शनि व्यक्तिला आपल्या जबाबदर्‍यांच्या प्रती सावध बनवतो. कुण्डली मध्ये  शनि जेंव्हा बलवान स्थीती मध्ये असतो तेंव्हा व्यक्ति आपल्या कार्याला वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयास करते.


4. स्नेह, सहयोगपूर्ण व्यवहार (Co-operation & Cordial attitude at the workplace)
 कित्येकदा एखाद्या व्यक्ती मध्ये  योग्यता असते तो दक्ष देखिल असतो पण तो आपल्या कठोर व्यवहारा मुळे व्यवसायिक जगतात चांगले संबंध राखू शकत नाही. व्यवहारात  मधुरता नसल्यास कार्य क्षेत्रामध्ये व्यक्तिस टिकून काम करण्यात त्रास होतो ते सहज शक्य होत नाही. चन्द्र वा शुक्र कुण्डली मध्ये  शुभ भावांमध्ये असल्यास (Venus, Moon in auspicious houses) व ते शुभ प्रभाव टाकणारे असल्यास व्यक्ति मध्ये कमी योग्यता असुन देखिल ती व्यक्ती झटपट व सहजच  सफलता प्राप्त करते. अपल्या स्नेहपूर्ण व्यवहाराच्या जोरावर अशे लोक शीघ्र मन जिंकुन घेतात. गोष्टी जेंव्हा बिघडू लागतात हे आपल्या सहयोगपूर्ण व्यवहाराच्या जोरावर सांभाळून घेतात. चन्द्र वर जर कोणताही प्रकारे जर अशुभ प्रभाव असेल्यास व्यक्ति मध्ये सहयोग करण्याची वृत्ती नसते.

5. यान्त्रिक योग्यता (Technical Skills revealed by Jyotish)
 आजच्या जमान्यात  सफलता प्राप्त करण्यास व्यक्तिस कॉम्प्यूटर सारख्या यंत्रांचे ज्ञान असणे जरूरीचे आहे. कोणाही व्यक्तिस यंत्राचे ज्ञान त्यांचा वापर करण्याची क्षमता कशी आहे हे पाहण्या साठी मंगळ व शनि यांचा संबंध तपासावा लागतो. तसा तो संबंध असल्यासच ही योग्यता येते.(Aspect between Mars and Saturn) केतुस मंगळा प्रमाणे मानले जाते त्यामुळे केतुचा संबंध मंगळाशी असल्यास हीयोग्यता येते. अशा प्रकारे जेंव्हा जन्म कुण्डली माध्ये मंगळ, शनि व केतु पैकी दोन तरी ग्रहांचा संबंध नोकरी-धंद्या संबंधीत भावांचे कार्येश असता व्यक्तीस यंत्रांचे ज्ञान असते.

6.  वाकशक्ति (Communication Skills & Vedic Astrology)
 बुध जन्म कुण्डली मध्ये सुस्थिर असक्यास व्यक्तिस व्यापारिक क्षेत्रात सफलता मिळ्ण्याची संभावना चांगलीच असते. याच सोबत  बुध ग्रहाचा संबंध  दूसरा भाव किंवा भावेश यांच्याशी असल्यास व्यक्तिची वाकशक्ति उतम असते. वाकशक्ति प्रबल असता व्यक्तिस  त्यासंबंधीत क्षेत्रात चटकन सफलता प्राप्त करता येते.

मंगलवार, 15 जून 2010

व्यवसाय प्रगति, नोकरी मध्ये प्रमोशन व ग्रहयोग (Your Promotion and astrology)

image
नोकरी मध्ये प्रमोशन व्यवसायात प्रगति 
नोकरी मध्ये प्रमोशन व्यवसायात प्रगति कधी मिळेल ?
र्‍याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो. काही जणांना कठोर परीश्रम करुनही फार कमी मोबदला मिळतो, तर काहींना कमी श्रमात गड्गंज पैसा मिळतो हा ग्रह तसेच त्यांचे गोचर यांचा प्रभाव असतो.
 सफलता कधी कशी कुठल्या माध्यमातुन मिळेल. कोण उन्नति चे शिखर सर करेल हे  ज्योतिष शास्त्राच्या मदतीने सरळ जाणून घेता येते. यात प्रगतिचा कालखंड देखिल निर्धारीत करता येतो.
कृष्णमुर्ति पद्धति मध्ये नोकरी,व्यवसाय संबंधीत प्रश्न महादशा स्वामिंचे कार्येश भाव अर्थार्जना संबधीत ६,११,२,१०,७ ह्या शुभ भावांचा महादशा स्वामि कार्येश आहे की नाही हे पहाणे जरुरी असते. ९,१,१२,८,५ हे भाव महादशा स्वामिचे मुख्य कार्येश भाव असल्यास नोकरी व्यवसायात अड्चणी नक्की येतात. आपल्या कुंडली मध्ये १० (द्शम) स्थानाचा उपनक्षत्र स्वामि हा नोकरी साठी व ६ (षष्ठ ) स्थानाचा उपनक्षत्र स्वामि हा व्यवसाया साठी बघतात. वर उल्लेख केलेल्या ६,११,२,१०,७ ह्या शुभ भावांचा म्युख्य कार्येश असल्यास जातकाला नक्की चांगलेच यश मिळते. मात्र महादशा स्वामि देखिल ह्या भावांचा पुरक कार्येश असावा. अंतर्दशा, विदशा सर्व अनुकुल असता प्रमोशन प्रगति होते तर ९,१,१२,८,५ हे भाव १० (द्शम) ६ (षष्ठ ) स्थानाचा उपनक्षत्र व स्वामि महादशा स्वामिचे मुख्य कार्येश भाव असल्यास नोकरी व्यवसायात अडचणी येतात कठोर परिश्रमांचे चिज होत नाही.