शनिवार, 7 अगस्त 2010

दशा फल

महादशा किंवा अंतर्दशा स्वामि एखाद्या ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर तो त्या ग्रहाच्या (नक्षत्र स्वामिच्या) कार्येश भावांच्या नुसार प्रभाव पडत असतो.

रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतु

रवि

१ रवि लग्नात किंवा लग्नेश असता. जातक दृढनिश्चयी, अधिकार गाजवणारा, चपळ, संयमी, न थकता प्रयत्न करणारा, स्वावलंबी, मेहनती, उच्च विचार, व दिलदार स्वभाव राहील. दृष्टी दोष संभवतात, मात्र आरोग्य चांगले राहाते.

२ रवि धनात किंवा धनेश असता. जातक स्वकष्टाने धन कमावणारा, तसेच शासन वडिल व्यवस्थपन या द्वारे धन कमावेल. कुटूंब प्रमुखाची भुमिका निभावावी लागते, कौटूंबीक सौख्य उत्तम लाभेल.

३ रवि तृतियात किंवा तॄतियेश असता. जातक पराक्रमी,लोक संपर्क उत्तम असतो, उत्साही, न भीणारा, स्वतंत्र विचारांचा, खर्‍याची बाजू घेणरा, एजंट्चे काम चांगले जमते साधारणतः औषधे, वनस्पती, अन्नधान्य ही क्षेत्रे लाभदायक. शासकीय - उत्पादने, योजना, कंत्राट याद्वरे लाभ होईल.

४ रवि चतुर्थात किंवा चतुर्थेश असता. जातकास गृहसौख्य चांगले लाभते, शिक्षणात यश विषेशतः वैद्यकिय शिक्षण, शेति, अन्नधान्य, औषध-रसायन-विज यात यश.व्यवस्थापन वडीलोपार्जीत स्थावर मालमत्ता लाभ शासकीय योजनेतुन घर मिळते.

५ रवि पंचमात किंवा पंचमेश असता. जातक उमद्यास्वभावाचा, खेळ्कर, दृढनिश्चयी, संगीत कला व मैदानी खेळांची आवड रहील. शेअर्स खरेदी, प्रेमप्रकरण संभवते पुत्र संतत्ती साठी चांगला कालखंड .भागीदारीत अपयश मिळेल सावध रहावे.

६ रवि षष्ठात किंवा षष्ठेश असता. जातक मनोबल कमी, अस्वस्थता जाणवते, उष्णतेचे विकार होतात. धनार्जन उत्तम होईल, हाता खालच्या माणसांवर वचक चांगला, नोकरीत स्थिरता लाभेल, कर्ज मिळेल.

७ रवि सप्तमात किंवा सप्तमात असता. जातकास प्रवासात अड्थळे, कयदेशीर बाबींच्या कट्कटी संभवतात.सरकारी कामा मध्ये अडचणी एतत.धंद्या मध्ये स्थिरता लाभेल. औषध- रसयने - अन्नधान्य या संबधीत व्यवसायात यश, विवाह, वैवाहिक जीवनात सुख लाभेल.

८ रवि अष्ट्मेश किंवा अष्ट्मात असता. जातकास सरकारी कामा मध्ये अडचणी, कोर्टात अपयश. नाचक्की, नोकरी व्यवसयात नुक्सान, चोरी मनस्ताप, पितॄ वियोग, सरकरी अधिकारी त्रास देतील. अपघत योग संभवतो सावध रहावे. ऑपरेशन हृदयविकार, बद्ध कोष्टता, स्त्रीयंना पळीचे त्रस, अप्रसवता संभवते सावध रहावे.

९ रवि नवमात किंवा नवमेश असता. जातकास शिक्षणात यश विषेशतः वैद्यकिय शिक्षण, (प्र)शासकीय खर्चाने परदेशगमन योग,शासन वडिल व्यवस्थपन या द्वारे मदत लाभेल. साक्षातकार लाभेल, अचुक निर्णय घेईल मान संन्मान लाभेल.पदवी किताब बक्षिस मिळण्यास कालखंड चांगला.

१० रवि दशमात किंवा दशमेश असता. जातक धनर्जन उत्तम होईल, नोकरीत बढ्ती, स्वतंत्र व्यवसाय करेल. पैकी एक मत्र प्रगति होईल. राजकारणात यशस्वी होईल. मेहनती व बुद्धीमान, व आनंदि वृत्ती लाभेल.

११ रवि लाभात किंवा लाभेश असता. जातकास शिक्षणात यश विषेशतः वैद्यकिय शिक्षण अनेक मित्र असतात, ते नेहमी मदत करणारे लाभतील, आत्मविश्वास चांगला, धनर्जन उत्तम होईल, सरकारी कामात यश, अनेक प्रकारचे लाभ होतील.

१ ): (१)लग्नातील ग्रह किंवा लग्नेश (१) रवि नक्षत्रात व रवि ११ : प्रकृती उत्तम, इतरांवर वचक, अधिकार योग कल्पना शक्ती चांगली.

२ ): (२) धनातील ग्रह किंवा धनेश (२) रवि नक्षत्रात असता. : कुटूंब वृद्धी, कुटूंबा कडून लाभ.

३ ): (३) तील ग्रह किंवा (४) रवि नक्षत्रात असता. : लेखन प्रवास एजन्सी छपाईतुन लाभ.

४ ): (४) तील ग्रह किंवा (४) रवि नक्षत्रात असता. : घर, वाहन, खरेदी वीक्री, शेती-अन्नधान्य उत्पदन, शिक्षणात व शिक्षण क्षेत्राततुन लाभ.

५ ): (५) तील ग्रह किंवा (५) रवि नक्षत्रात असता. : शेअर जुगार लॉट्री तुन लाभ. संत्तत्ती लाभ.

६ ):(६) तील ग्रह किंवा (६) रवि नक्षत्रात असता. : निवडणूकीत यश कोर्ट कचेरीत यश सरकरी कर्ज मंजुरी नोकर चांगले .

७ ):(७) तील ग्रह किंवा (७) रवि नक्षत्रात असता. : भागीदरी व्यवसाय तुन लाभ. विवाह सुख्य व लाभ.

८ ): (८) तील ग्रह किंवा (८) रवि नक्षत्रात असता. : विमा फंड ग्र्यॅज्यूइटी तुन लाभ. नुकसन भरपाई मिळते.

९ ): (९) तील ग्रह किंवा (९) रवि नक्षत्रात असता. : पी.एच.डी., डीग्री, मार्गदर्शन चांगले लाभते. परदेश प्रवासातुन लाभ.

१० ): (१०) तील ग्रह किंवा (१०) रवि नक्षत्रात असता. : बढ्ती, मानसन्मान तुन लाभ.

१२): (१२) तील ग्रह किंवा (१२) रवि नक्षत्रात असता. : परदेशी व्यक्ती संस्था हॉस्पिट्ल जेल यमाध्यमातुन लाभ होतो.

१२ रवि व्ययात किंवा व्ययेश असता. जातकास त्यागी वॄत्ती, सर्वसाधारण जीवनमान, दूरचे प्रवास, कोर्ट कचेरीत अपयश, मोठी गुंतवणूक होते. खर्चिक, शासना कडून जप्ती, अथवा कर वसुली. 

3 टिप्‍पणियां:

 1. NAME PRASHANT DADAJI ITEKAR
  JANMA SHTAN, JAGONA, DIST WARDHA ( MAHARASHTRA)
  TIME ; NIGHT BETWEEN 9.30 TO 10.30
  DOB- 22/02/1986
  LAGNA CHA YOG SANGA ?
  JANMA PATRIKA PATHWA.

  उत्तर देंहटाएं
 2. Namaskar sir,Mazya mulichi birth date 21 january 1994, Time-1.25am,Place-Mumbai.Tiche job ani lagan ch kdhi hoyil.Rply As far as possible.

  उत्तर देंहटाएं
 3. Namaskar sir,Mazya mulichi birth date 21 january 1994, Time-1.25am,Place-Mumbai.Tiche job ani lagan ch kdhi hoyil.Rply As far as possible.

  उत्तर देंहटाएं