सोमवार, 18 अक्टूबर 2010

स्वप्न शकुन ( स्वप्नांचे अर्थ )


स्वप्न शकुन

स्वप्नांचे अर्थ

भारतीय दर्शनशास्त्रानुसार  भूतकाळ, वर्तमानकाळ आणि  भविष्य यांचे सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये उपस्थीत असतात.  जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी  संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि  स्वप्नांचे माध्यम बनते. 

॥ जे मनी नसे तेही स्वप्नी दीसे ॥
जी व्यक्ती सक्रीय असते ती स्वप्न बघते,आणि जी व्यक्ती स्वप्न बघत नाही ती व्यक्ती जीवंत असू शकत नाही. थोडक्यात प्रत्येक जीवंत व्यक्ती स्वप्न बघतेच. फक्त जन्माने अंध व्यक्ती स्वप्न बघू शकत नाहीत नहीं देख पण त्यांना स्वप्नात ध्वनी एकता येतो. म्हणजेच त्यांना देखिल स्वप्न पडते. आणि स्वप्न काय झोपतानाच पडतात असं नाही ती जागे पणी पण तर पडतात.  
स्वप्नांचे पुढील दोन प्रकार पडतात,
१ जागृत अवस्थे मधील स्वप्न
 जागृत अवस्थे मधील स्वप्न कवी, लेखक, प्रेमी-प्रेमीका, अविवाहित कीशोर, युवक-युवती यांना अधीक पडतात. हे  स्वप्न कलात्मक असतात . 

२ निद्रावस्थे मधील स्वप्न
 भारतीय दर्शनशास्त्रानुसार  भूतकाळ, वर्तमानकाळ आणि  भविष्यकाळ यांचा सुक्ष्म स्वरुपात वायुमंडळा मध्ये वावर असतो. जेंव्हा एखादी व्यक्ती नीद्रावस्थे मध्ये असते तेव्हा ती सूक्ष्माकार होउन आपल्या भूत आणि भविष्य यांच्याशी  संपर्क स्थापीत करते. हेच संपर्क स्वप्नांचे कारण आणि  स्वप्नांचे माध्यम बनते. एखाद्या वक्तीची साधाना खूपच प्रबल असते ती व्यक्ती जागे पणी देखील किंवा ध्यान अवस्थे मध्ये या भूतकाळ वा भविष्यकाळाशी संपर्क साधू शकतो. त्यालाव योगी अथवा द्रष्टा किंवा अंतरयामी बोलले जाते. 
 आपल्या अचेतन मानाची झेप खूपच मोठी असते. आपले अचेतन मनाचा वावर फक्त आपल्या शरीरा पर्यंतच  नसतो, ते विश्वाच्या कोणत्याही कोपर्‍यात जेंव्ह पाहीजे तेंव्हा पोहचू शकते. या मनाच्या शक्तीच्या माध्यमातूनच तीनही लोकांच्या कोणत्याही भागात जेंव्हा पाहीजे तेंव्हा पोहचता येते, आणि उसके कोठे काय चालले आहे हे जाणून घेता येते.
नीरर्थक स्वप्न कोणती ?
स्वप्न जागेपणी बघीतले त्याचे फलीत आपण स्वतः घडवायचे असते, तोकाही संकेत नसतो. तसेच दिवसभर ज्या विषयाशी आपला संबध आलेला आहे ते विषय. किंवा जोविषय आपण गेले काही दिवस मनात त्याचा विचार करतोय त्या विषयाचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ शोधण्यात काहीच लाभ नाही. तसेच मध्य रात्री झोप लागल्या बरोबर,  दूपारी झोपले असता, पडलेले स्वप्न कोणताही संकेत देत नसते अशीस्वप्न नीरर्थक समजावीत. रात्री जर अनेक स्वप्न पडली तर सुरवातीची स्वप्न नीरर्थक ठरतात शेवटचे स्वप्न फल देणारे ठरते.
स्वप्नांचे फल केंव्हा मिळते ?
  स्वप्न रात्री तीन वाजल्या पासून ते पहाटे सुर्योदया पूर्वी पडलेल्या स्वप्नांचे फलीत लवकरच मिळते साधारणतः सात दिवसा मध्ये आपल्याला याची प्रचीती येते. मध्य रात्री पडलेले स्वप्न ( रात्री १२. ते पहाटे ०३ दरम्यान पडलेले स्वप्न ) साधारणतः एक महीन्यात आपले फल देते. व मध्य रात्री पुर्वी पडलेली स्वप्न एक वर्षाभरा मध्ये आपले फल देते.
पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात हा समज सर्वत्र आहे. पण त्यात काही प्रमाणात सत्य असले तरी जसे स्वप्न दीसले तसेच ते घडणार असे नसून विशीष्ट स्वप्न पडले असता त्याचे विशीष्ट अर्थ असतो.
 शुभ स्वप्न फल विचार :

1 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला डोक्यावर  घर जळताना दीसले, तर त्याला  अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो. ( जास्त मोठा अधीकार. )
2 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  कानात कुंडल, डोक्या वर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ गातलेली दीसेल त्याला निश्चितच उच्चाधीकार व त्यातून लाभ  प्राप्त होतात.
स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला आपण आपल्या शत्रूंना पराजीत करताना दीसला तर त्याला बढती हमखास मिळते.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वतः जर समुद्र  पार करताना पाहील्यास त्याला  जास्त मोठा अधीकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
4 . एखाद्यास जर कमळाच्या पानावर बसून स्वतः खीर खाताना पाहीले तर त्याला राजकीय पद नवडणुक जिंकण्याचा योग वा मंत्री पद प्राप्त होते. 
5 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात आपल्या योनिचे क्षेत्र विकसित होतान दीसले तर तीला निश्चीतच कोणत्या तरी  पुरुषाची संपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो.
6 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतःचे सगळे केस गळून गेलेले व स्वतःला टक्कल पडलेले दीसेल  तर त्याला अमुल्य धनप्राप्ती होते.
7 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  कुंभार मडके बनवताना दीसल्यास त्याचे स्वतःचे दूखः लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे. 
8 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  स्वतः उंच भींतीवर बसलेले पाहील्यास सुख-संपत्ति प्राप्त होते.
9 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  स्वतःच्या वया पेक्षा मोठे झालेले दीसले तर त्याला मान-सम्मान प्राप्त होतो.
अशुभ स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात  स्वतःला टक्कल पडलेले दीसले तर गरीबीचा सामना करण्याचे योग संभवतात. 
2 . एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर  स्वतःस दुर्घटना घडताना दीसली तर लवकरच आजार पण संभवते.
3 . एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर  स्वतः प्रवासा साठी वाहनद्वारे जाण्याची तयारी करताना दीसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा कारण अपघात भय दीसते.
4 . एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर  स्वतः आरशे फोडत असल्याचे दीसते त्याच्या परीवारात कोणाचा तरी  मृत्युसम संकट येते.
5 . एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर  मुंग्याना स्वतः मारताना पाहील्यास व्यापार नाश संभवतो. 
6 .एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर  स्वतःची नाव तूफानी वादळात फंसलेली दीसल्यास येणारा काळ  पुर्ण असण्याची ही सूचना समजावी. 
7 . एखाद्याला  स्वप्ना मध्ये जर  स्वतः  कडू औषध घेताना पाहील्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत. 
8 . स्वप्नात रडणारे बालक दीसणे आजारपण व  निराशा यांची सूचना देते. 
प्रणय संबंधी स्वप्न फल विचार :
1 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात  रत्नजड़ीत आंगठी अथवा नेकलेस बघते तीचे वैवाहीक जीवन सुखी होते. 
2 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस  कोण्या मित्राने दीलेल्या बांगड्या घालताना पाहील्यास  शीघ्र विवाह होतो.
3 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला   कोणतेही सुंदर वस्त्र दीसल्यास त्याला मधुर स्वभावाची विदुषी पत्नी प्राप्त होते.
4 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला   औरत को घूंघट निकालते देखता है तो उसका दांपत्य जीवन सुखमय व्यतीत होता है।
5 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला   अपली हरवलेली वस्तु पुन्हा मिळवल्यास त्याला आगामी जीवनात  सुख मिळते .
6 . एखाद्या स्त्रीला ( युवती ) जर स्वप्नात स्वतःस  मेळा , यात्रा, जत्रा, कार्नीवल, मॉल, अथवा फॅशन शोमध्ये स्वतः भाग घेतला असेल,
 7 . अथवा त्यामध्ये लोक यांच्या कडे बघत असतील किंवा यांना बघण्यासाठी लोक येत असतील, किवा स्वतःस फीरताना पाहील्यास  योग्य नोकरी व योग्य पती प्राप्त होतो.
8 . एखाद्याला स्वप्ना मध्ये जर  इंद्रधनुष दिसल्यास वास्तविक जीवन सुखमय राहील.
 9 . एखादी अविवाहित युवती अपल्या  प्रेमीला कोण्या दुसर्‍याच युवतीशी विवाह करताना पाहीले तर तीचा विवाह शीघ्र होतो.
10 . स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला   कोणत्याही सुंदर व स्वस्थ्य नवजात बालकाला ( शिशु ) बघीतल्यास संतान प्राप्त होणार.
11 . एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पुरुष आंगठी भेट देताना दीसेल तर पती हिच्यावर खुपच प्रेम करेल.
मिश्रीत स्वप्न फल विचार :
1. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  जीवंत गीधाड दीसता सौभाग्य वृद्धि ,जर गीधाड आकाशात उंच उडताना दीसल्यास जास्त लाभदायक.
2. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला   साफ-सुथरी श्मशान भूमी दीसल्यास व्यापार  वृद्धि होईल. 
3. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  स्वतःस पुस्तक वाचताना पाहील्यास समाजात मान-सम्मान वाढतो.
4.स्वप्ना मध्ये जर मशीनने कोणासही गवत कापताना पाहील्यास  सौभाग्य वृद्धी होते.
5. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  कोण्या युवतीला कानातले ( कर्णफूल ) घालताना पाहील तर लवकरच शुभवार्ता ऐकण्यास मिळेल.
6. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला   धान्याची रास दीसेल तर स्वतःच्या परीश्रमाने सफलता प्राप्त होईल.
7. स्वप्ना मध्ये जर एखाद्या स्त्रीला   धान्याची रास दीसेल तर  सहज मार्गाने धनप्राप्त होईल.
8. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वतः कॉफी अथवा चाहा  पीताना पाहील्यास त्याला जीवनात हर्ष्-उल्हास व समृद्धी लाभेल.
9. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  स्वतःच्या हात व पायात दुखत असल्याचे दीसल्यास धन प्राप्ती होते.
10. स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला  कारागीर बनून घर बनवताना पाहील्यास जीवनात अपार सफलता मिळेल. क्रमशः

सोमवार, 4 अक्टूबर 2010

॥ बारा ज्योर्तीलिंगांचे स्मरण ॥

 द्वादश ज्योतिर्लिंगानि 
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं
उज्जयिन्न्यांमहाकाल मोंकारममलेश्वरम । १ 
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरं
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने । २  .
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये  ३ .
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात: पठेन्नर:
सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति  ४  .
अर्थ : १ सौराष्ट्र प्रदेश (काठियावाड़) मध्ये श्री सोमनाथ,
२ श्रीशैल येथे श्री मल्लिकार्जुन,
३ उज्जयिनी मध्ये श्री महाकाल,
४ ओंकारेश्वर येथे, अमलेश्वर,
 परली मध्ये वैद्यनाथ,
६ डाकिनी नामक स्थान में श्रीभीमशंकर,
 सेतुबंध येथे श्री रामेश्वर,
८ दारुकावन मध्ये श्रीनागेश्वर,
९ वाराणसी (काशी) येथे श्री विश्वनाथ,
१० गौतमी (गोदावरी) तीरावर श्री त्र्यम्बकेश्वर ,
११ हिमालय वर श्रीकेदारनाथ, और
१२ शिवालय येथे, श्री घुश्नेश्वर,
जो मनुष्य ह्या बारा ज्योर्तीलिंगाच्या नावांचे जरी रोज पहाटे
 व संध्याकाळी स्मरण केले तरी आपल्या गेल्या सात जन्मांच्या
 पापांचा नाश होतो व शुभ फळे मिळतात.  
।। ॐ श्री शिवार्पणमस्तु  ।।
*********************************

शनिवार, 7 अगस्त 2010

दशा फल

महादशा किंवा अंतर्दशा स्वामि एखाद्या ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर तो त्या ग्रहाच्या (नक्षत्र स्वामिच्या) कार्येश भावांच्या नुसार प्रभाव पडत असतो.

रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहू केतु

रवि

१ रवि लग्नात किंवा लग्नेश असता. जातक दृढनिश्चयी, अधिकार गाजवणारा, चपळ, संयमी, न थकता प्रयत्न करणारा, स्वावलंबी, मेहनती, उच्च विचार, व दिलदार स्वभाव राहील. दृष्टी दोष संभवतात, मात्र आरोग्य चांगले राहाते.

२ रवि धनात किंवा धनेश असता. जातक स्वकष्टाने धन कमावणारा, तसेच शासन वडिल व्यवस्थपन या द्वारे धन कमावेल. कुटूंब प्रमुखाची भुमिका निभावावी लागते, कौटूंबीक सौख्य उत्तम लाभेल.

३ रवि तृतियात किंवा तॄतियेश असता. जातक पराक्रमी,लोक संपर्क उत्तम असतो, उत्साही, न भीणारा, स्वतंत्र विचारांचा, खर्‍याची बाजू घेणरा, एजंट्चे काम चांगले जमते साधारणतः औषधे, वनस्पती, अन्नधान्य ही क्षेत्रे लाभदायक. शासकीय - उत्पादने, योजना, कंत्राट याद्वरे लाभ होईल.

४ रवि चतुर्थात किंवा चतुर्थेश असता. जातकास गृहसौख्य चांगले लाभते, शिक्षणात यश विषेशतः वैद्यकिय शिक्षण, शेति, अन्नधान्य, औषध-रसायन-विज यात यश.व्यवस्थापन वडीलोपार्जीत स्थावर मालमत्ता लाभ शासकीय योजनेतुन घर मिळते.

५ रवि पंचमात किंवा पंचमेश असता. जातक उमद्यास्वभावाचा, खेळ्कर, दृढनिश्चयी, संगीत कला व मैदानी खेळांची आवड रहील. शेअर्स खरेदी, प्रेमप्रकरण संभवते पुत्र संतत्ती साठी चांगला कालखंड .भागीदारीत अपयश मिळेल सावध रहावे.

६ रवि षष्ठात किंवा षष्ठेश असता. जातक मनोबल कमी, अस्वस्थता जाणवते, उष्णतेचे विकार होतात. धनार्जन उत्तम होईल, हाता खालच्या माणसांवर वचक चांगला, नोकरीत स्थिरता लाभेल, कर्ज मिळेल.

७ रवि सप्तमात किंवा सप्तमात असता. जातकास प्रवासात अड्थळे, कयदेशीर बाबींच्या कट्कटी संभवतात.सरकारी कामा मध्ये अडचणी एतत.धंद्या मध्ये स्थिरता लाभेल. औषध- रसयने - अन्नधान्य या संबधीत व्यवसायात यश, विवाह, वैवाहिक जीवनात सुख लाभेल.

८ रवि अष्ट्मेश किंवा अष्ट्मात असता. जातकास सरकारी कामा मध्ये अडचणी, कोर्टात अपयश. नाचक्की, नोकरी व्यवसयात नुक्सान, चोरी मनस्ताप, पितॄ वियोग, सरकरी अधिकारी त्रास देतील. अपघत योग संभवतो सावध रहावे. ऑपरेशन हृदयविकार, बद्ध कोष्टता, स्त्रीयंना पळीचे त्रस, अप्रसवता संभवते सावध रहावे.

९ रवि नवमात किंवा नवमेश असता. जातकास शिक्षणात यश विषेशतः वैद्यकिय शिक्षण, (प्र)शासकीय खर्चाने परदेशगमन योग,शासन वडिल व्यवस्थपन या द्वारे मदत लाभेल. साक्षातकार लाभेल, अचुक निर्णय घेईल मान संन्मान लाभेल.पदवी किताब बक्षिस मिळण्यास कालखंड चांगला.

१० रवि दशमात किंवा दशमेश असता. जातक धनर्जन उत्तम होईल, नोकरीत बढ्ती, स्वतंत्र व्यवसाय करेल. पैकी एक मत्र प्रगति होईल. राजकारणात यशस्वी होईल. मेहनती व बुद्धीमान, व आनंदि वृत्ती लाभेल.

११ रवि लाभात किंवा लाभेश असता. जातकास शिक्षणात यश विषेशतः वैद्यकिय शिक्षण अनेक मित्र असतात, ते नेहमी मदत करणारे लाभतील, आत्मविश्वास चांगला, धनर्जन उत्तम होईल, सरकारी कामात यश, अनेक प्रकारचे लाभ होतील.

१ ): (१)लग्नातील ग्रह किंवा लग्नेश (१) रवि नक्षत्रात व रवि ११ : प्रकृती उत्तम, इतरांवर वचक, अधिकार योग कल्पना शक्ती चांगली.

२ ): (२) धनातील ग्रह किंवा धनेश (२) रवि नक्षत्रात असता. : कुटूंब वृद्धी, कुटूंबा कडून लाभ.

३ ): (३) तील ग्रह किंवा (४) रवि नक्षत्रात असता. : लेखन प्रवास एजन्सी छपाईतुन लाभ.

४ ): (४) तील ग्रह किंवा (४) रवि नक्षत्रात असता. : घर, वाहन, खरेदी वीक्री, शेती-अन्नधान्य उत्पदन, शिक्षणात व शिक्षण क्षेत्राततुन लाभ.

५ ): (५) तील ग्रह किंवा (५) रवि नक्षत्रात असता. : शेअर जुगार लॉट्री तुन लाभ. संत्तत्ती लाभ.

६ ):(६) तील ग्रह किंवा (६) रवि नक्षत्रात असता. : निवडणूकीत यश कोर्ट कचेरीत यश सरकरी कर्ज मंजुरी नोकर चांगले .

७ ):(७) तील ग्रह किंवा (७) रवि नक्षत्रात असता. : भागीदरी व्यवसाय तुन लाभ. विवाह सुख्य व लाभ.

८ ): (८) तील ग्रह किंवा (८) रवि नक्षत्रात असता. : विमा फंड ग्र्यॅज्यूइटी तुन लाभ. नुकसन भरपाई मिळते.

९ ): (९) तील ग्रह किंवा (९) रवि नक्षत्रात असता. : पी.एच.डी., डीग्री, मार्गदर्शन चांगले लाभते. परदेश प्रवासातुन लाभ.

१० ): (१०) तील ग्रह किंवा (१०) रवि नक्षत्रात असता. : बढ्ती, मानसन्मान तुन लाभ.

१२): (१२) तील ग्रह किंवा (१२) रवि नक्षत्रात असता. : परदेशी व्यक्ती संस्था हॉस्पिट्ल जेल यमाध्यमातुन लाभ होतो.

१२ रवि व्ययात किंवा व्ययेश असता. जातकास त्यागी वॄत्ती, सर्वसाधारण जीवनमान, दूरचे प्रवास, कोर्ट कचेरीत अपयश, मोठी गुंतवणूक होते. खर्चिक, शासना कडून जप्ती, अथवा कर वसुली. 

रविवार, 1 अगस्त 2010

कांदा खाऊन वांदा

 
 कांदा खाऊन वांदा 
    




                           
          तुम्हाला जर धनवान व्हायचे असेल तर हा लेख अवश्य वाचा !


     भारतात जैन धर्माच्या लोकांन मध्ये खाण्या पिण्या संबंधीत व आचरणा संदर्भात काही नियम आहेत यातील एक विशेष नियम म्हणजे हे लोक कांदा लसूण इत्यादी जमिनीतून येणार्‍या  वस्तु ( मुळ ) खात नाहीत. ह्या समजातील लोक बर्‍याच वेळेस खुप धनवान देखिल असतात. तसेच पुर्वी भारतात ब्राम्हण समाजात देखिल या गोष्टी खाण्यात वर्ज करत.आता तुम्ही म्हणाल कांदा लसुण व धन यांचा काही संबंध तरी आहे का ? की भेटलाय फूकट चा ब्लॉग लिहायला तर काहीही लिहा.पण तसे नाही हे रहस्य जर तुम्हाला समझायचे असेल तर हा लेख पुर्ण वाचा. आपल्याला सुद्धा धनवान बनवण्यास त्यामूळे  मदत होईल.
     तुम्हाला जर पावसाच्या या सुंदर संध्याकाळी कांदाभजी खावीशी वाटली किंवा जर करी इत्यादी बनवायची असल्यस तुम्ही काय कराल ?  सरल उत्तर आहे तुम्ही तुमच्या जवळ आसलेल्या चार कांद्यां चा वापर करून स्वादीष्ट भजी बनवाल किंवा करी इत्यादीत वापराल.

    मी तुम्हाला पुन्हा विचारेन की," जर आपण या कांद्यांना न कापता जर भजी व करी बनवली असती तर काय झाले असते ?"  आपण झट्कन उत्तर द्याल, "अहो,  कांदा नाही टाकला तर कांद्याचा चव येणार नाही व भजे व कढ़ी  स्वादिष्ट होणार नाहीत."


     आता याचा दुसर्‍या प्रकारे पण वापर होऊ शकतो, तो असाकी आपण आपल्या कडे असलेले चारही कांदे एखाद्य कुंडीत लावा व यांची जी पाने येतात त्या कांदा पत्त्यांचा वापर करुन आपण कांदा भजी बनवाल आपल्याला तोच फलेवर व स्वाद मिळाला असता जो कांदा कापुन टाकलात तेंव्हा आला होता. व या  विधि मध्ये आपण दर 3  ते 7 दिवसात या कांदा पत्त्यांना कापून  4 कांद्यांचा जीवन भर नाही तर काही काळ तरी नक्कीच घेतला असता.     बस हिच जैन मारवडी समाजाची हिच खासियत आहे, हे जेवढे शक्य असेल तेवढे मूळधन हे सांभाळून ठेवतात. यालाच हे लोक मूड़ी बोलतात. केवळ मूळा पासुन उत्पन्न पानं (व्याज) खाऊन जीवनभर काम चालवून घेतात.  ह्याच समाजाच्या एक व्यक्तीने आमच्याशी संवद सधताना सांगीतले की जर 10000 रूपये कोणास को 2 रूपये शेकड़ा व्याजावर  दील्यास तसेच हे व्याज मुळ रक्कमे मध्ये दर महीन्यला जोडत गेल्यास त्याचे साधारण  30 वर्षात अंदाजे 1 करोड़ रूपये होतात.


     जर तुमच्या पुर्वजांनी 100 वर्षां पुर्वी जर 15 प्रतिशत चक्रवाढ व्याजाने  तुमच्या नावाने फक्त 1 रूपया फिक्स डिपोजिट केला असता तर  आज तुमच्या खात्यात त्याचे 10 लाख रूपये जम असते ! विचार करा ! 
  आपल्या पुर्वजांनी कांदा खाल्ला आणि आपला वांदा झाला नाही का ? आपल्या कडे सोन्याचे अंडी देणारी कोंबडीची कथा प्रसिद्धच आहे .
चला तर  संकल्प करुया कांदा खाणार नाही तर त्याच्या पान रुपी व्याज खाईन आणि धनवान होईन !
टिप : आम्ही कांदा खात नाही तसेच आम्हास कांदा जमिनी खाली येतो की झाडाला उगवतो ते देखिल माहित नाही. लेखाची भावना समजून घ्या. 

गुरुवार, 8 जुलाई 2010

नि:शुल्क जन्मपत्रिका !

नि:शुल्क जन्मपत्रिका ! 

 नि:शुल्क जन्मपत्रिका !आपल्याला ज्योतिष्यशास्त्रा विषयी काहीच माहीत नाही ?
काहीच हरकत नाही. आपल्याला  आपली जन्म कुंडली 
व त्या वरून मार्गदर्शन या ठिकाणावर अगदी निशुल्क मिळेल.
आपण आमचे अनुसरणकर्ते व्हा !
मात्र आपला ईमेल ने आम्हाला शक्य झाल्या बरोबर लगेच आपल्याला प्रिंट काढता येण्या जोगी जन्म पत्रिका पाठवू.

बुधवार, 16 जून 2010

तिळा तिळा दार उघड ....


शरीरावरील तिळ आणि तुमचे भाग्य

तिळा तिळा दार उघड .... आठवलं काही ? हो त्या परवलीच्या शब्दा नंतर गोष्टीतील  अलीबाबाचं भाग्य उजळतं,
 पण आपल्या शरीरावर असणार्‍या तिळाने तुमच्या भाग्याचे दरवाजे कशे उघडणार हे मात्र कळू शकतं. आपल्या शरीरावर कीती तिळ आहेत हे कधी तपासा आणि त्याचा तुमच्या भाग्याशी असणारा संबंध बघा....


शरीर वर तिळ -----    त्याचे फळ
कपाळावर ---------        बलवान असाल.
हनुवटीवर--------          स्त्रीशी प्रेम कमी.
भुवयांच्यामध्ये--           प्रवास होत रहातील.
उजव्या डोळ्यावर ----   स्त्रीशी प्रेम.
डव्या डोळ्यावर----      स्त्रीशी कलह.
उजव्या गालावर-----     धनवान होइल.
डव्या गालावर------       खर्च वाढत जाइल.
ओठांवर----------           विषय-वासना यात गुंतुन राहील.
कानावर----------          अल्पायु होण्याची शक्यता.
मानेवर----------            आराम मिळेल.
उजव्या हातावर-----      मान-प्रतिष्ठा मिळेल.
डव्या हातावर------       भांडखोर स्वभाव राहील.
नाकावर----------          यात्रा प्रवास होतील.
उजव्या छाती वर-----    स्त्रीशी प्रेम राहील.
डव्या छाती वर------     स्त्रीशी भांडणे होतील.
कमरेवर-----------          आयुष्य त्रासात जाईल.
दोन्हीं छातीच्या मध्ये---जीवन सुखी रहील.
पोटावर----------           उत्तम भोजनसाठी इच्छुक.
पाठीवर---------            प्रवासात रहातील.
उजव्या तळव्यावर------ बलवान होइल.
डव्या तळव्यावर------    खूप खर्च करेल.
उजव्या हातच्या पाठी-- धनवान होइल.
डव्या हाताच्या पाठी---कमी खर्च करा.
उजव्या पायावर---------बुद्धिमान होइल.
डव्या पायावर ---         खर्च अधिक होइल.

करिअर मध्ये सफलता गुण व ग्रहयोग यांचा संबंध


नोकरी-धंद्या मध्ये सफलता व प्रगती होण्या साठी व्यक्ति मध्ये अनेक गुण असावे लागतात. सर्वच गुण एकाच  व्यक्ति मध्ये सापडणे संभव नसते. कोणा कडे  योग्यता आहे तर कोणास बराच अनुभव  असतो. कोणी व्यक्ति अपल्या कर्यक्षेत्रामध्ये स्नेह पूर्ण व सहयोगपूर्ण व्यवहार असल्याने सफल होतो. तर कोणी बोलण्याच्या चातुर्या मुळे जम बसवून असतो काही  कार्यनिष्ठा असल्याने सफलता  प्राप्त करुन घेतात. अपल्या कार्यशक्ति व दक्षता यांचा सर्वोतम उपयोग करुनच आजच्या गळेकापू स्पर्धेच्या युगामध्ये पुढे जाण्याचे साहस करुशकतात. ज्योतिष शास्त्रा अनुसार कोणत्या ग्रहांमुळे  व्यक्ति मध्ये कोणत्या गुणांचा विकास होतो ते आपण पाहुया......

1. कामाचे स्वरुप व त्याची जबाबदरी ओळ्खण्याची कुवत (Understanding The Job Responsibilities)
 काम लहान असो की मोठे ते करण्याची पद्धत एकसमानच असेलच असे नाही, प्रत्येक व्यक्ति कार्य आपल्या योग्यते  नूसार करतो.जेंव्हा कोणा व्यक्तिला आपले कामकाज नीट समझत नाही तेंव्हा त्याला त्या कार्यक्षेत्रा मध्ये अडचणींचा सामना करावा लागु शकतो. व्यक्तिचे  कार्य  उत्कृ्ष्ट बनवण्या साठी ग्रहांमध्ये गुरु ग्रहाचे कारकत्व बघतात.

कुण्डली मध्ये  गुरु बलवान व मार्गी असला व तो शुभ ग्रहांच्या प्रभाव मध्ये असला तर तो व्यक्तिस  अपल्या क्षेत्रात उतम ज्ञान असण्याची शक्यता जास्त असते.(Strong Jupiter suggests excellent knowledge). गुरु जन्म कुण्डली मध्ये नीच राशित (Guru in Neecha Rashi), वक्री वा अशुभ ग्रह  प्रभावा मध्ये असेल तर व्यक्ति मध्ये कामकाजा  संबधीत जाणकारी  कमी असु शकते. सर्व ग्रहांमध्ये  गुरु  ज्ञान  कारक ग्रह समजला जातो. गुरु ग्रह व्यक्तिस चांगली स्मरणशक्ति प्रदान करतो.त्या मुळे चांगल्या  स्मरणशक्तिच्या मुळे व्यक्ति अपल्या योग्यतेचा नेमक्या वेळी उपयोग करु शकतो.

2. कार्यक्षमता व दक्षता (Skills & Performance Through Astrology)
 कोणाही व्यक्ति मध्ये कार्यक्षमतेचा स्तर तपासण्या साठी कुण्डली मध्ये शनिची स्थिति बघीतली जाते.(Saturn's position is considered for judging skills).कुण्डली मध्ये शनि दशम भावशी संबंध असल्यास  व्यक्तिस कार्यक्षेत्र मध्ये अत्यंत अधिक कार्यभार असतोच असतो.काही वेळा असेही होते की व्यक्ति मध्ये उतम योग्यता असते परंतु त्याचे कार्या मध्ये मन  लागत नाही.
 अशा स्थिती मध्ये व्यक्ति अपली  योग्यतेचा पूर्ण उपयोग करु शकत नाही किंवा व्यक्तिचे बारावा भाव बलवान  (Strong 1२th house)  असल्यास व्यक्तिस आराम करण्याची आवड फार असते. त्यामुळे तो व्यक्ती आळ्शी बनतो. व अश्या स्थिति मध्ये व्यक्ति अपल्या उत्तरदायीत्वांशी ( कामा पासुन ) पळ काढतो. या जबाबदार्‍या पारिवारीक, सामाजिक, उपजिविकेच्या माध्यमा संबंधीत असु शकतात. शनि बलवान स्थिती मध्ये असल्यास व्यक्तिच्या कार्या मध्ये दक्षता येते.

3. कार्यनिष्ठा: (Analysis of Dedication through Jyotish)
 जन्म कुण्डली  अनुसार व्यक्ति मध्ये  कार्यनिष्ठा  भाव बघण्यासाठी दशम घराशी शनिचा संबध बघीतला जातो.(Saturn's relationship to the 10th house). आपल्या कार्याला अनुशासन बघण्यासाठी सूर्याची स्थिती बघीतली जाते. शनि व सूर्याच्या स्थिती अनुसार व्यक्ति मध्ये अनुशासन  भाव निर्माण होतो. शनि व्यक्तिला आपल्या जबाबदर्‍यांच्या प्रती सावध बनवतो. कुण्डली मध्ये  शनि जेंव्हा बलवान स्थीती मध्ये असतो तेंव्हा व्यक्ति आपल्या कार्याला वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयास करते.


4. स्नेह, सहयोगपूर्ण व्यवहार (Co-operation & Cordial attitude at the workplace)
 कित्येकदा एखाद्या व्यक्ती मध्ये  योग्यता असते तो दक्ष देखिल असतो पण तो आपल्या कठोर व्यवहारा मुळे व्यवसायिक जगतात चांगले संबंध राखू शकत नाही. व्यवहारात  मधुरता नसल्यास कार्य क्षेत्रामध्ये व्यक्तिस टिकून काम करण्यात त्रास होतो ते सहज शक्य होत नाही. चन्द्र वा शुक्र कुण्डली मध्ये  शुभ भावांमध्ये असल्यास (Venus, Moon in auspicious houses) व ते शुभ प्रभाव टाकणारे असल्यास व्यक्ति मध्ये कमी योग्यता असुन देखिल ती व्यक्ती झटपट व सहजच  सफलता प्राप्त करते. अपल्या स्नेहपूर्ण व्यवहाराच्या जोरावर अशे लोक शीघ्र मन जिंकुन घेतात. गोष्टी जेंव्हा बिघडू लागतात हे आपल्या सहयोगपूर्ण व्यवहाराच्या जोरावर सांभाळून घेतात. चन्द्र वर जर कोणताही प्रकारे जर अशुभ प्रभाव असेल्यास व्यक्ति मध्ये सहयोग करण्याची वृत्ती नसते.

5. यान्त्रिक योग्यता (Technical Skills revealed by Jyotish)
 आजच्या जमान्यात  सफलता प्राप्त करण्यास व्यक्तिस कॉम्प्यूटर सारख्या यंत्रांचे ज्ञान असणे जरूरीचे आहे. कोणाही व्यक्तिस यंत्राचे ज्ञान त्यांचा वापर करण्याची क्षमता कशी आहे हे पाहण्या साठी मंगळ व शनि यांचा संबंध तपासावा लागतो. तसा तो संबंध असल्यासच ही योग्यता येते.(Aspect between Mars and Saturn) केतुस मंगळा प्रमाणे मानले जाते त्यामुळे केतुचा संबंध मंगळाशी असल्यास हीयोग्यता येते. अशा प्रकारे जेंव्हा जन्म कुण्डली माध्ये मंगळ, शनि व केतु पैकी दोन तरी ग्रहांचा संबंध नोकरी-धंद्या संबंधीत भावांचे कार्येश असता व्यक्तीस यंत्रांचे ज्ञान असते.

6.  वाकशक्ति (Communication Skills & Vedic Astrology)
 बुध जन्म कुण्डली मध्ये सुस्थिर असक्यास व्यक्तिस व्यापारिक क्षेत्रात सफलता मिळ्ण्याची संभावना चांगलीच असते. याच सोबत  बुध ग्रहाचा संबंध  दूसरा भाव किंवा भावेश यांच्याशी असल्यास व्यक्तिची वाकशक्ति उतम असते. वाकशक्ति प्रबल असता व्यक्तिस  त्यासंबंधीत क्षेत्रात चटकन सफलता प्राप्त करता येते.

मंगलवार, 15 जून 2010

व्यवसाय प्रगति, नोकरी मध्ये प्रमोशन व ग्रहयोग (Your Promotion and astrology)

image
नोकरी मध्ये प्रमोशन व्यवसायात प्रगति 
नोकरी मध्ये प्रमोशन व्यवसायात प्रगति कधी मिळेल ?
र्‍याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो. काही जणांना कठोर परीश्रम करुनही फार कमी मोबदला मिळतो, तर काहींना कमी श्रमात गड्गंज पैसा मिळतो हा ग्रह तसेच त्यांचे गोचर यांचा प्रभाव असतो.
 सफलता कधी कशी कुठल्या माध्यमातुन मिळेल. कोण उन्नति चे शिखर सर करेल हे  ज्योतिष शास्त्राच्या मदतीने सरळ जाणून घेता येते. यात प्रगतिचा कालखंड देखिल निर्धारीत करता येतो.
कृष्णमुर्ति पद्धति मध्ये नोकरी,व्यवसाय संबंधीत प्रश्न महादशा स्वामिंचे कार्येश भाव अर्थार्जना संबधीत ६,११,२,१०,७ ह्या शुभ भावांचा महादशा स्वामि कार्येश आहे की नाही हे पहाणे जरुरी असते. ९,१,१२,८,५ हे भाव महादशा स्वामिचे मुख्य कार्येश भाव असल्यास नोकरी व्यवसायात अड्चणी नक्की येतात. आपल्या कुंडली मध्ये १० (द्शम) स्थानाचा उपनक्षत्र स्वामि हा नोकरी साठी व ६ (षष्ठ ) स्थानाचा उपनक्षत्र स्वामि हा व्यवसाया साठी बघतात. वर उल्लेख केलेल्या ६,११,२,१०,७ ह्या शुभ भावांचा म्युख्य कार्येश असल्यास जातकाला नक्की चांगलेच यश मिळते. मात्र महादशा स्वामि देखिल ह्या भावांचा पुरक कार्येश असावा. अंतर्दशा, विदशा सर्व अनुकुल असता प्रमोशन प्रगति होते तर ९,१,१२,८,५ हे भाव १० (द्शम) ६ (षष्ठ ) स्थानाचा उपनक्षत्र व स्वामि महादशा स्वामिचे मुख्य कार्येश भाव असल्यास नोकरी व्यवसायात अडचणी येतात कठोर परिश्रमांचे चिज होत नाही.

बुधवार, 20 जनवरी 2010

लग्न राशी जर


मेष असेल तर माणूस नेहमी बालकच असतो.
वृषभ  असेल तर धन बनवण्याची मशीन असतो.
मिथुन असेल तर टेलीफ़ोन असतो.
कर्क असेल तर भावना प्रधान असतो.
सिंह असेल तर अहंकारी असतो.
कन्या असेल तर कर्ज शत्रु आजार यांनी वेढलेला असतो.
तुळ असेल तर फायद्याचा विचार करणारा असतो.
वृश्चिक असेल तर भूतांचा सरदार असतो.
धनु असेल तर वाड-वडीलांच्या गोष्टी करणारा असतो.
मकर असेल तर २४ तास काम करणारा असतो.
कुम्भ असेल तर नाते जोडण्यात पटाईत असतो.
मीन असेल तर मौन बाळ्गणरा असतो.

लग्ना पासुन  सूर्य जर :-

प्रथम भावात असेल तर अहंकारी असतो.
दूसर्‍या भावात असल्यास प्रसिद्धिच्या पुढे काही दिसणार नाही.
तीसर्‍या भावात असल्यास नेतागीरी करणारा.
चौथ्या  भावात असल्यास राजकारणी माणसा सारखा विचर करेल.
पंचम भावात असल्यास तो परिवार मे ही राजकारण करतो.
सहव्या भावात वडीलांना नोकर समझतो.
सातव्या  भावात जीवन साथी चा गुलाम असतो.
आठव्या भावात तो बिचारा 'दिल का मरीज' असतो.
नवव्या भावात तो धर्मिक गोष्टीं पासुन कमाई करतो.
दहाव्या भावात तो सर्व काम नेतागीरी करत करतो.
आकराव्या भावात तो वडीलांना नोटा छापायची मशीन समझतो.
बाराव्या भावात असल्यास तो डोळ्यांचे त्रास दाखवतो.

लग्ना पासुन  चंद्र जर :- 

प्रथम भावात असेल तर मना पासुन काम करणारा असतो.
दूसर्‍या भावात असल्यास विचारांनी धनवान राहील.
तीसर्‍या भावात असल्यास इतरांना प्रत्येक गोष्ट विचारुन करणरा.
चौथ्या  भावात असल्यास काम घर काम हेच विश्व रहाते.
पंचम भावात असल्यास  मनोरंजना मध्ये दंग रहातो.
सहव्या भावात  तो कामाचा फक्त विचर करतो.
सातव्या  भावात  असता प्रत्ञेक बाबतीत आईचा सल्ला घेतो.
आठव्या भावात तो मनाचा थांग लागणे कठीण.
नवव्या भावात तो  प्रत्येक काम दैवावर अवलंबून ठवतो.
दहाव्या भावात तो  कार्य करन्याच्या योजन आखतो पण करत काहीच नाही.
आकराव्या भावात तो कमाई करण्या आधीच तो कर्ज करणारा असतो.
बाराव्या भावात असल्यास तो तंत्र, मंत्र व ज्योतिष यात रुचि राहील.